निधन वार्ता
माजी सरपंच थोरात यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयराम पुंजा थोरात (वय-८७) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात सात भाऊ,चार मुलें,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ होत होते आहे.
माजी सरपंच स्व.जयराम थोरात जवळके ग्रामपंचायतीचे सन-१९८२ ते १९८७ या दरम्यान सरपंच होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते.ते मनमिळाऊ व स्पष्टवक्ते म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.त्यांच्यावर आज रात्री नऊ वाजता थोरात वस्ती येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहे.ते जवळके ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बंडोपंत थोरात यांचे पिताश्री तर गणेश सहकारी साखर कारखाण्याचे चीफ केमिस्ट एन.पी.थोरात यांचे जेष्ठ बंधू होते.