निधन वार्ता
कोपरगाव नगरपरिषद बांधकाम अभियंता गावित यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद येथे शहर अभियंता या पदावर अवघ्या अठरा दिवसांपूर्वी ०४ ऑक्टोबर रोजी रुजू झालेले एस.एम.गावित यांना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदय विकाराचा मोठा झटका आल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात भरती केले असता तेथे त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.गावित हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी होते.त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात स्थापत्य अभियंता म्हणून केली होती.पुढे त्यांनी आपल्या कर्तृत्वावर शहर अभियंता हे वर्ग एकचे पद प्राप्त केले होते.व तेवीस वर्षे सेवा बजावली होती.ते येथे एकटेच रहात होते.
या घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ,मुलगा यांनी कोपरगावकडे धाव घेतली होती.त्यांनी त्यांचे पार्थिव आपल्या मूळ गावी पिंपळनेर येथे नेले असून उद्या दहा वाजेच्या सुमारास त्यांचा अंत्यविधी होणार असल्याची माहिती कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
त्यांच्या पच्छात भाऊ,पत्नी,तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांना आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छातीत त्रास जाणवायला लागला होता.त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात भरती केले होते.उपचार सुरू असतानाच त्यांचे आज दुपारी २.३०वाजेच्या सुमारास निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाने कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजयराव वहाडणे,गटनेते रवींद्र पाठक,राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते विरेन बोरावके,सेनेचे गटनेते योगेश बागुल,कैलास जाधव ,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साठे,कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.