निधन वार्ता
जेष्ठ नेते उत्तमराव जोंधळे यांना मातृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण भागातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व त्यासाठी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीचे नेते व संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील रहिवासी प्रगतशील शेतकरी उत्तमराव जोंधळे (नाना) व माजी सरपंच सोपानराव जोंधळे यांच्या मातोश्री मातोश्री कै.द्रौपदाबाई सिताराम जोंधळे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुली ,नातवंडे असा परिवार आहे.
स्व.द्रौपदाबाई जोंधळे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कौठे कमळेश्वर परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर गावातील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.द्रौपदाबाई जोंधळे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून कौठे कमळेश्वर परिसरात प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर गावातील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी संगमनेर,राहाता, कोपरगाव तालुक्यातील अनेक नातलग व मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या निधनाबद्दल युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक पत्रकार नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,सोन्याबापू उर्हे,गंगाधर रहाणे,रमेश दिघे,नामदेव दिघे,अशोक गांडूळे,विठ्ठलराव पोकळे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,विठ्ठलराव देशमुख,सचिव कैलास गव्हाणे,बाबासाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.