जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी २६० कोटी निधी-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघात आपण तीन वर्षात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांसाठी ७० गावांना तब्बल २६० कोटी निधी आणून मतदार संघाच्या ९९ टक्के गावांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“विकासाचे राजकारण करण्याची आपल्या पक्षाची परंपरा आहे.त्यामुळे निधी देतांना नेहमी राजकारण बाजूला ठेवून माझ्या मतदार संघातील जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजवर केलेल्या प्रामाणिक पाठपुराव्यातून मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव-वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील आपेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९६.५८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच शिरसगाव येथे ९.२० लक्ष रुपये निधीतून श्री. मारुती मंदिर ते जिल्हा परिषद शाळा रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन व ओपन जिम साहित्याचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,”विकासाचे राजकारण करण्याची आपल्या पक्षाची परंपरा आहे.त्यामुळे निधी देतांना नेहमी राजकारण बाजूला ठेवून माझ्या मतदार संघातील जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजवर केलेल्या प्रामाणिक पाठपुराव्यातून मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात आपेगावला पिण्याचे पाण्यासाठी १.२५ लाखाचे पाईप दिले आहे.काळे परिवाराची हि परंपरा पुढे चालवतांना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत परावलंबी असलेल्या आपेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ९६.५८ लाखाचा निधी दिला आहे.तीन वर्षात आजवर मतदार संघातील ९९ टक्के गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटला असून उर्वरित गावांचा पाणी प्रश्न देखील लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक सरपंच अशोक उकिरडे यांनी केले तर सूत्रसंचालन उपसरपंच इरफान यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार ग्रामसेवक संजय काटे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close