निधन वार्ता
वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.डोखे यांचे निधन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.रामभाऊ मुरलीधर डोखे यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले आहे.त्यांच्यावर पुणतांबा येथे गोदातीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या वेळी मोठा जनसमूह उपस्थित होता.त्यांच्या पच्छात एक भाऊ,पत्नी,तीन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अड्.डोखे हे मूळचे वैजापूर तालुक्यातील डोंणगाव येथील रहिवाशी होते.मात्र लग्नानंतर ते शिक्षण संपल्यावर पुणतांबा येथे व्यवसायांसाठी स्थायिक होऊन त्यांनी आपली कर्मभूमी पुणतांबा मानली होती.त्यानंतर त्यांनी कोपरगावात १९८० पासून कोपरगावात वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.तो पासून चाळीस वर्ष त्यांनी जनतेची विधी सेवा केली होती.कोपरगाव वकील संघाचे सन-२०१२-१३ या कालखंडात अध्यक्ष होते
स्व.रामभाऊ डोखे हे कायम हसतमुख व मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात असत.ते लहानापासून थोरांपर्यंत त्यांनी अखेरपर्यंत टिकवले होते.ते मूळचे वैजापूर तालुक्यातील डोंणगाव येथील रहिवाशी होते.मात्र लग्नानंतर ते शिक्षण संपल्यावर पुणतांबा येथे व्यवसायांसाठी स्थायिक होऊन त्यांनी आपली कर्मभूमी पुणतांबा मानली होती.त्यानंतर त्यांनी कोपरगावात १९८० पासून कोपरगावात वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.तो पासून चाळीस वर्ष त्यांनी जनतेची विधी सेवा केली होती.कोपरगाव वकील संघाचे सन-२०१२-१३ या कालखंडात अध्यक्ष होते.त्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणूनही काम केले होते.राहाता न्यायालयात काम करत असताना त्यांना नकळत कोरोना विषाणूची लागण झाली होती.त्यातून न्यूमोनिया होऊन उपचारार्थ त्यांना मालपाणी रुग्णालयात भरती केले होते.उपचारानंतर ते बरे होऊन घरीही आले होते.त्यांनी आपले न्यायालयीन कामकाज सुरूही केले होते.मात्र पंधरा दिवसांनी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा उपचारार्थ दवाखान्यात भरती केले असता उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता.त्या नंतर त्यांनी अंजिओग्राफी नंतर त्यांनी अँजिओप्लास्टी केली होती.मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्यावर पुणतांबा येथे गोदावरी तीरी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.अशोक टुपके,अड्.भास्करराव गंगावणे यांनी त्यांना वकील संघाचे वतीने श्रद्धांजली वाहिली आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव,पुणतांबा परिसरात शोककळा पसरली आहे.