गुन्हे विषयक
..ती गायब महिला व मुलगा अखेर सापडला

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील दि.२४ डिसेंबर रोजी अचानक गायब झालेली तीस वर्षीय महिला व तिचा मुलगा आठ वर्षीय मुलगा हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास गायब झाल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल झाली होती.तिचा शोध लावण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले असून हे गायब माता-पुत्र गायब महिलेच्या औरंगाबाद येथील बहिणीकडे गेले असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान अन्य चार नागरिकांना शोधण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.
सदर गायब महिला हि आपल्या औरंगाबाद येथील बहिणीकडे घरच्या नातेवाईकांना काही एक कारण न सांगता गेली होती.ती तेथे न सांगता का गेली होती.तिला घरी कुटुंबाकडून काही त्रास होता किंवा नाही याबाबत पोलिसांनी सोयीस्कररित्या मौन पाळलेले आहे.त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील तक्रारदार इसम (वय-६१) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्या घरातील तीस वर्षीय महिला व त्यांचा आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा हे दि.२४ डिसेंबर रोजी रहस्यमय रित्या गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती.त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले होते.शिर्डीतून दोनशेहून अधिक नागरिक गायब होण्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने गंभीर दखल घेतली व त्यावर कारवाही करण्याचे सक्त फर्मान काढले होते.या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्व आले होते.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलिसांची जोखीम वाढली होती.त्यामुळे त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपासासाठी धाडले होते.त्यांनी तपासाला गती देऊन या महिलेचा व गायब अल्पवयीन मुलाचा शोध लावला आहे.
सदर गायब महिला हि आपल्या औरंगाबाद येथील बहिणीकडे घरच्या नातेवाईकांना काही एक कारण न सांगता गेली होती.ती तेथे न सांगता का गेली होती.तिला घरी कुटुंबाकडून काही त्रास होता किंवा नाही याबाबत पोलिसांनी सोयीस्कररित्या मौन पाळलेले आहे.त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान डिसेंबर महिन्यात अन्य चार व्यक्तीही रहस्यमय गायब झाल्या होत्या त्यांचाही तपास पोलिसानी लावला आहे.व सर्व व्यक्तींना आपल्या कुटुंबियांच्या सुखरूप ताब्यात दिल्याने पोलिस अधिकारीं दौलतराव जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.