जाहिरात-9423439946
निधन वार्ता

निर्भीड लोकनेता हरपला…या खासदारांचे प्रतिपादन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  

   महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांचे निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असून राज्याने एक स्पष्टवक्ता निर्भीड लोकनेता गमावला असल्याची प्रतिक्रिया शिर्डी लोकसभेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

   राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे.बारामतीत झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मेडिकल कॉलेजबाहेर समर्थकांची गर्दी उसळली आहे.तर,संपूर्ण पवार कुटुंबही बारामतीत दाखल झाले आहेत.उद्या,२९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

खा.भाऊसाहेब वाकचौरे.

   दरम्यान महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान,अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे.उद्या सकाळी २९ जानेवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघणार आहे.गदिमा चौक,विद्यानगरी चौक,विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता,मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाणार आहे.सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे.या राज्यातील विविध नेत्यांनी शोकसंदेश प्रसिद्ध केले आहे.त्यात शिर्डी लोकसभा  मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपली संवेदना व्यक्त केली आहे.त्यात ही प्रतिक्रिया नोंदवली आहे.त्यांनी या घटनेने आपल्याला व शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेला तीव्र दुःख व्यक्त झाले असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close