निधन वार्ता
आपल्यासह तालुक्याचा आधारवड हरपला-…यांची श्रद्धांजली

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी मनाला अत्यंत वेदना देणारी व सुन्न करून टाकणारी असून माझ्यासाठी आयुष्यातील ही अत्यंत वाईट घटना आहे.ते आपल्यासाठी फक्त एक राजकीय नेते नव्हते तर एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

“अजित पवार यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाशी विशेष जिव्हाळा आणि प्रेम होते.रस्ते,पाणी,शिक्षण,आरोग्य,शेती आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर दिलेला निधी केवळ सहकार्य व मदत नसून कोपरगावकर जनतेवर केलेले प्रेम असल्याचे सांगितले आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी 8.30 वाजच्या सुमारास विमान अपघातात निधन झाले आहे.त्यामुळे राज्यात या बातमीने शोककळा पसरली आहे.त्याबाबत राज्यातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.कोपरगाव तालुक्यातील मान्यवर त्याला अपवाद नाही.आ.काळे यांनी या आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.त्यांनी त्यात म्हटले आहे की,”त्यांचा आपल्यावरील विश्वास,प्रेम आणि आदर आणि त्यांनी दिलेलं प्रेम शब्दांत मांडता येणार नाही.त्यांनी आपल्यावर प्रेम करून कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची मागणी पूर्ण करतांना माझे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते त्यामुळे आपल्याला जीव लावणारे माझ्या मायेचे छत्र हरपले आहे.अजित पवार यांच्याशी माझे नाते नेतृत्व आणि कार्यकर्ता यापलीकडचे होते.ते नेहमीच समजून सांगतांना आणि मार्गदर्शन करतांना त्यांच्या शब्दांनी मनाला उभारी मिळायची.
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने एक दिलखुलास,अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असलेला नेता राज्याने गमावला आहे.ही दुःखद घटना दुर्दैवी आणि मनाला तीव्र वेदना देणारी अत्यंत धक्कादायक व मन सुन्न करणारी आहे.आपल्या २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांचेसोबत विधिमंडळात काम करण्याची संधी मिळाली तो अनुभव चांगला आणि तालुक्याच्या विकासासाठी चांगला होता”-अशोक काळे,माजी आमदार,कोपरगाव.
अजित पवार यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाशी विशेष जिव्हाळा आणि प्रेम होते.रस्ते,पाणी,शिक्षण,आरोग्य,शेती आणि औद्योगिक विकासासाठी मोठ्या प्रमाणावर दिलेला निधी केवळ सहकार्य व मदत नसून कोपरगावकर जनतेवर केलेले प्रेम असल्याचे सांगितले आहे.त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली असून ती कधीच भरून निघणार नाही.माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला असल्याची भावना शेवटी आ.काळे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.



