निधन वार्ता
संतोष ससाणे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्व.शिवाजीराव ससाणे यांचे सुपुत्र संतोष शिवाजीराव ससाणे (वय-63) यांचे आज सायंकाळी 07 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.संतोष ससाणे हे अत्यंत मितभाषी व्यक्तीमत्व होते.त्यांनी आपल्या शेतीत अनेक नवनवीन प्रयोग केले होते.त्यांच्यावर उद्या सकाळी 10.30 वाजता गोदावरी तिरी संवत्सर या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सरकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पार जाणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक पार जाणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.



