निधन वार्ता
कमळाबाई गायकवाड यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील पोस्टमास्तर व छायाचित्रकार दत्तात्रय ज्ञानदेव गायकवाड यांच्या आजी गं.भा.कमळाबाई कचरू गायकवाड यांचे गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे दोन वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८० वर्षाच्या होत्या.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

कै.कमळाबाई या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाचा व नातवाचा सांभाळ करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले होते.
कै.गं.भा.कमळाबाई यांचे चिरंजीव ज्ञानदेव कचरु गायकवाड हे गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघामध्ये सेवेत होते.गेल्या दोन वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने त्यांचेही निधन झालेले आहे.
कै.कमळाबाई या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या होत्या.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुलाचा व नातवाचा सांभाळ करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन एक यशस्वी गृहिणी म्हणून संवत्सर परिसरात त्यांनी आपला नांवलौकीक प्राप्त केला,त्यांच्यामागे सुन व नातू दत्तात्रय व पणतू असा मोठा परिवार आहे.कै.कमळाबाई यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



