निधन वार्ता
शोभाताई गमे यांचे निधन

न्यूजसेवा
धामोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील रहिवासी शोभाताई सुर्यभान गमे (वय- 54) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.धामोरी येथील प्रगलशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते कैलासराव उसरे यांच्या त्या भगिनी होत्या.
स्व.शोभाताई सुर्यभान गमे या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून धामोरी आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



