निधन वार्ता
माजी प्राचार्य वर्पे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहील्यानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप वर्पे यांचे पिताश्री गोरक्षनाथ गयाजी वर्पे (वय-82) यांचे काल सायंकाळी 5.30 वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर आज दुपारी 12.30 वाजता कोपरगाव अमरधाम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

दरम्यान त्यांचा संदीप वर्पे,डॉ.नचिकेत वर्पे,समीर वर्पे आदीसह कुटुंबाने काल सायंकाळी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला होता.कायम छायाचित्र काढण्यास प्रतिबंध करणारे प्राचार्य वर्पे यांनी त्या दिवशी त्यांना काय संकेत मिळाले माहिती नाही मात्र विरोध केला नव्हता हे विशेष ! त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
माजी प्राचार्य स्व.गोरक्षनाथ वर्पे यांनी राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.आपल्या शिक्षणानंतर त्यांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात प्राध्यापक म्हणून आपल्या सेवेची सुरुवात फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजीराव महाविद्यालयात केली होती.यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1943 रोजी झाला होता.त्यांचें मूळ गाव राहुरी तालुक्यातील गुहा हे होते.त्यावेळी त्यांनी राज्यात प्रसिद्ध प्राचार्य व विचारवंत शिवाजीराव भोसले यांचे बरोबर काम केलं होते.त्यानंतर त्यांनी 1970 साली कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैय्या महाविद्यालयात आपली सेवा बजावली होती.त्यानंतर त्यांनी राहुरी येथे स्व.बाबुराव दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात संस्थापक प्राचार्य म्हणून सेवा सुरु केली होती.सन-1978 साली पुन्हा के.जे.सोमय्या महाविद्यालयात पदार्पण करून प्राचार्य म्हणून सेवेत सुरू झाले होते.दरम्यान येथे त्यांनी आधी अर्थशास्त्र विभाग आणि एन.एस.एस.चे प्रमुख म्हणून सेवा बजावली होती.

माजी प्राचार्य स्व.गोरक्षनाथ वर्पे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे संस्थापक खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,खा.निलेश लंके,माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींनी या निधनाबद्दल दूरध्वनीवरून दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान सन -1990-91 पासून ते 1998 पर्यंत सेवा बजावली होती.जून-1997 मध्ये त्यांचा अपघात झाला होता.शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.त्या अपघातानंतर ते सावरले होते.त्यांनी राहाता येथील महाविद्यालयात आपली शेवटची सेवा बजावल्यानंतर सन-1998 साली स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती.दरम्यान त्यांचा संदीप वर्पे,डॉ.नचिकेत वर्पे,समीर वर्पे आदीसह कुटुंबाने काल सायंकाळी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला होता.कायम छायाचित्र काढण्यास प्रतिबंध करणारे प्राचार्य वर्पे यांनी त्या दिवशी त्यांना काय संकेत मिळाले माहिती नाही मात्र विरोध केला नव्हता हे विशेष ! त्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांचेवर आज दुपारी-12.30 वाजता कोपरगाव येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करणेत आले आहे.त्यांच्या पश्चात डॉ.नचिकेत वर्पे,समीर वर्पे आदीं मुले आहे.

सदर प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान,माजी नगरसेवक दिनार कुदळे,सिनेअभिनेते चंद्रकांत शिंदे आदीसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.



