जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रविकिरण डाके यांना पितृशोक

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव,राहाता तालुक्यातील प्रसिध्द आर्किटेक्ट रवी किरण डाके यांचे पिताश्री व सेवानिवृत्त माध्यमिक क्रीडा शिक्षक प्रभाकर मारुती डाके (सर)(वय -82) यांचे आज दुपारी 03 वाजता वृद्धाप काळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे सायंकाळी 7.45 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार होणार आहे.

स्व.प्रभाकर डाके सर.

  

स्व.प्रभाकर डाके यांनी आपल्या सेवेची सुरुवात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर तालुक्यातील जनता हायस्कूल येथे केली होती.त्यानंतर त्यांची बदली पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या ग.र.औताडे येथील माध्यमिक विद्यालयात झाली होती.या ठिकाणी ते विशेष रमले होते.त्यांना या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून ओळख मिळाली होती.त्यानंतर त्यांनी जवळपास पस्तीस वर्षे शिक्षण सेवा बजावली होती व त्याच ठिकाणी ते सन -2000 साली सेवानिवृत्त झाले होते.विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विशेष ख्याती होती.

   स्व.प्रभाकर डाके हे शेवगाव तालुक्यातील रहिवासी होते.त्यांनी आपले मराठी आणि संस्कृत विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपल्या सेवेची सुरुवात रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर तालुक्यातील जनता हायस्कूल येथे केली होती.त्यानंतर त्यांची बदली पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या ग.र.औताडे येथील माध्यमिक विद्यालयात झाली होती.या ठिकाणी ते विशेष रमले होते.त्यांना या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून ओळख मिळाली होती.त्यानंतर त्यांनी जवळपास पस्तीस वर्षे शिक्षण सेवा बजावली होती व त्याच ठिकाणी ते सन -2000 साली सेवानिवृत्त झाले होते.विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची विशेष ख्याती होती.त्यांच्या पत्नीचे तीस वर्षापूर्वी निधन झाल्यावर त्यांचेवर सर्व परिवाराची जबाबदारी आली होती.मात्र त्यांनी ती लिलया पेलवली होती.स्व.लीलाबाई डाके याही रयत शिक्षण संस्थेत सेवा करत होत्या.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वामी नरेंद्र महाराज यांचे शिष्यत्व पत्करले होते व स्वतःला अध्यात्मात गुंतवून घेतले होते.मात्र अलीकडील काळात त्यांच्यावर जीर्ण व्याधीने जोर केला होता.अलीकडील अंतिम काळात त्यांचा कोपरगाव येथील आपल्या मुलगा रविकिरण डाके यांचेकडे मुक्काम होता.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे चालणे फिरणे बंद झाले होते.तो आजार अधिक बळवल्याने आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास रहात्या घरी सुभद्रानगर येथे शेवटचा श्वास घेतला आहे.

   त्यांच्यावर कोपरगाव,अमरधाम येथे आज सायंकाळी 7.45 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती माहितगार व्यक्तींनी दिली आहे.त्यांच्या निधनानंतर कोपरगाव,पोहेगाव,शेवगाव आदी ठिकाणी शोक व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

                  ——————————-

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close