निधन वार्ता
कारखाना संचालक बोरनारे यांना बंधुशोक

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व कर्मवीर काळे आसवणी प्रकल्पाचे कर्मचारी सुभाषराव आनंदराव बोरनारे (वय -52) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर संवत्सर येथील गोदातीरावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात आई,चार भाऊ,पत्नी,न,मुले,मुली असा मोठा परिवार आहे.ते कर्मवीर काळे कारखाण्याचे संचालक दिलीप बोरनारे यांचे बंधू होते.

  त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव विधानसभेचे आ.आशुतोष काळे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,संवत्सर ग्रामपंचायतीचे सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,खंडू पाटील फेपाळे,दिलीप ढेपले,ज्ञानेश्वर परजणे,भाऊसाहेब लोहकणे,श्री.पावके,मुकुंद काळे यांनी आदींनी दुःख व्यक्त केलं आहे.स्व.सुभाष बोरनारे हे अरुणराव बोरणारे,राजेंद्र बोरणारे यांचे बंधू होते.
 
					 
					 
					


