निधन वार्ता
कु.विद्या परजणे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी ज्येष्ठ कार्यकर्ते एस.एल.परजणे यांची पुतणी व देवराम लक्ष्मणराव परजणे यांची मुलगी कू.विद्या देवराम परजणे (वय -45) हिचे आज दुपारी 1.25 वाजेच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात चार चुलते,आई,वडील,तीन भाऊ असा परिवार आहे.आज 05 वाजता संवत्सर येथील गोदावरी नदीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.विद्या परजणे या अनेक वर्षापासून जीर्ण आजाराने त्रस्त होत्या.शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.25 वाजता त्यांचे निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.त्यांच्या अंत्यविधी समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.



