निधन वार्ता
अशोक चोपडे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर-कुंभारी येथील रहिवासी व राज्य श्री संत सावता माळी युवक संघाचे कोपरगाव शहर उपाध्यक्ष मनोज अशोक चोपडे यांचे पिताश्री अशोक विठ्ठल चोपडे (वय-७६वर्षे )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.अशोक चोपडे हे धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे म्हणून कोपरगाव आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या पश्चात मनोज चोपडे,अविनाश चोपडे आदी दोन मुले व
वैषाली विकास गिरमे ही मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.