निधन वार्ता
भीमाबाई घुमरे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व जुन्या पिढीतील शेतकरी पाराजी केशव घुमरे (वय-७५) यांची धर्मपत्नी भीमाबाई पाराजी घुमरे परवा सायंकाळी ०७.१५ वाजता राहत्या घरी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर काल सकाळी ०९.३० वाजता जवळके येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ व आप्तस्वकीय उपस्थित होते.ते जवळके येथील भागीनाथ घुमरे आणि सोमनाथ घुमरे यांच्या मातोश्री होत्या.