निधन वार्ता
मारुती थोरात यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी व जुन्या पिढीतील शेतकरी मारुती बाळाजी थोरात (वय-७९) यांचे काल सायंकाळी ०७.५० निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.

स्व.मारुती थोरात हे मितभाषी आणि कष्टाळू म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर काल रात्री ११.१५ वाजता जवळके येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ व आप्तस्वकीय उपस्थित होते.ते जवळके येथील रोजगार सेवक कानिफनाथ थोरात यांचे पिताश्री होते.