जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माधवराव मांढरे याचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

  कोपरगाव येथील प्रगतशील शेतकरी व मोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक माधवराव उर्फ संपतराव बारकू पा.मांढरे यांचे रविवार दि.१० ऑगस्ट  रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.मृत्युसमयी ते ८५ वर्षाचे होते.गेल्या अडीच ते तीन वर्षापासून ते आजाराशी झुंज देत होते.कोपरगांव येथील अमरधामध्ये त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

  कै.संपतराव मांढरे यानी गोदावरी दूध संघाचे संचालकपद भुषविलेले होते.संघाचे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे ते विश्वासू सहकारी होते.संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक व माजी मंत्री दिवंगत नेते शंकरराव कोल्हे यांच्या बरोबरही त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे काम केलेले होते.

  कै.संपतराव मांढरे यानी गोदावरी दूध संघाचे संचालकपद भुषविलेले होते.संघाचे दिवंगत नेते नामदेवराव परजणे यांचे ते विश्वासू सहकारी होते.संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक व माजी मंत्री दिवंगत नेते शंकरराव कोल्हे यांच्या बरोबरही त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे काम केलेले होते. कै.मांढरे यांचा शेतीबरोबरच ट्रकचा व्यवसाय होता.संजीवनी व कोळपेवाडी कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी त्यांच्या ट्रकचा वापर होत असे.प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक म्हणून त्यांचा कोपरगाव तालुक्यात सर्वत्र नावलौकीक होता आप्पा या टोपन नावाने ते ओळखले जायचे.कोपरगाव बाजारपेठेत व्यावसासिकांमध्ये त्यांचा सतत वावर असायचा.कै.मांढरे यांना सहा भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार होता त्यांचे सर्व बंधुचे यापूर्वीच निधन झालेले आहे.


  त्यांच्या पश्चात पत्नी,डॉ.सुनिल व ज्ञानेश्वर ही दोन मुले व सुना नातवंडे ,पणतू असा परिवार आहे.
गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी कै.मांढरे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबांचे सात्वन केले.अंत्यसंस्कारावेळी संजीवनी कारखान्याचे संचालक आप्पासाहेब दवंगे यांनी संजीवनी कारखाना व कोल्हे परिवाराच्या वतीने तर पिपल्स बँकेचे संचालक व व्यपारी सुनिल बंब व इतरांनी श्रध्दांजली वाहीली यावेळी अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close