निधन वार्ता
…या माजी मंत्र्यांचे निधन,सर्वत्र हळहळ !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जेष्ठ नेते,माजी मंत्री अशोकराव राजाराम पा.डोणगांवकर (वय-८२)यांचे काल,शनिवार दि.५ जुलै सकाळी ११.५७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार आज,०६ जुलै रोजी त्यांच्या गंगापुर तालुक्यातील मूळगावी डोणगांव येथे सकाळी ११ वाजता संपन्न झाले आहेत.त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील राजकारण,शिक्षण व विकासाची मोठी वाटचाल थांबली असल्याचे बोलले जात आहे.

स्व.अशोकराव डोणगावकर हे पोहेगाव येथे माजी आ.दादासाहेब रोहमारे यांच्या वस्तीवर आले असताना त्यांनी जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार शिर्डीस येणाऱ्या साई भक्तांसाठी व दिंड्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला जवळके,बहादरपुर मार्गे शिर्डी-वावी हा रस्ता जिल्हा मार्ग उन्नत करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता.परिणामी त्यास निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता.त्यात संजीवनी सहकारी कारखान्याचे संचालक स्व.संजय रोहमारे यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.
स्व.अशोकराव डोणगावकर यांनी आधी १९७७ मध्ये डोणगांव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली होती.त्याच सुमारास वाळूज सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली होती.पण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे १९८० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी विमानतळावर झालेली ऐतिहासिक भेट.इंदिरा गांधी यांनी त्यांची कामगिरी पाहून त्यांना तिथेच काँग्रेसचे विधानसभा तिकीट जाहीर केले होते.त्यांचा निर्णय योग्य ठरुण पुढे ते गंगापुर-खुलताबाद मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते हे विशेष !
राजकारणातून विकासाचे ध्येय गाठणारा नेता सन -१९८० ते १९८५ या कार्यकाळात त्यांनी गंगापुर-खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी अनेक निर्णायक कामे केली.राज्य परिवहन मंडळाचे बस आगार,विद्यार्थ्यांसाठी आय.टी.आय.नवीन महसुलचे तहसील कार्यालय या शिवाय तालुक्याला जोडणारे मुख्य रस्ते,वीज,पाणी योजना यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता.सन -१९९५ मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते.त्यांनी महाराष्ट्रात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी नांदूर-मधमेश्वर कालव्याला चालना दिली,नागपूर-मुंबई महामार्ग,गंगापुर-भेंडाळा रस्ता आणि घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना यांसारख्या प्रकल्पांना वेग दिला होता.या शिक्षण संस्था उभारून मुलींना शिक्षणाचे दारे खुली करून दिली होती.आज त्यांच्या संस्थेच्या दहा पेक्षा जास्त शाळा असून त्यात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
सामाजिक व राजकीय वारशाचा मोठा परिवारत्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई डोणगांवकर,जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष रमेश पाटील ,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष असलेला मुलगा किरण पाटील,नगर जिल्ह्यातील पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मुलगी मोनिका राजळे,मुलगा राहुल डोणगांवकर,मुलगी वैशाली सावंत व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.अशोकराव डोणगावकर हे सन १९९६-९७ मध्ये नगर जिल्ह्यातील पोहेगाव येथे माजी आ.दादासाहेब रोहमारे यांच्या वस्तीवर आले असताना त्यांनी जवळके येथील जनमंगल ग्रामविकास संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार मुंबई,ठाणे,कल्याण,गुजरात आदी ठिकाणाहून शिर्डीस येणाऱ्या साई भक्तांसाठी व दिंड्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला आणि सर्वात जवळचा असलेला व जवळके,बहादरपुर मार्गे शिर्डी-वावी हा रस्ता जिल्हा मार्ग उन्नत करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता.परिणामी त्यास निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता.त्यात संजीवनी सहकारी कारखान्याचे संचालक स्व.संजय रोहमारे यांनी महत्वाची भूमिका निभावली होती.त्यामुळे आज बहुतांशी दिंड्या आज याच मार्गाने शिर्डी जात असतात त्यात त्यांचे मोठे योगदान आहे.