निधन वार्ता
चंद्रभागाबाई खर्डे यांचे निधन

न्युजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी असलेल्या चंद्रभागा पांडुरंग खर्डे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.मृत्युसमयी त्यांचे वय ७३ होते.

स्व.चंद्रभागा खर्डे या अत्यंत मनमिळावू,प्रेमळ स्वभावाच्या म्हणून माहेगाव देशमुख आणि परिसरात परिचित होत्या.
त्यांच्या मागे तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पश्चात संजय खर्डे,अरुण खर्डे,अशोक खर्डे,पांडुरंग खर्डे यांच्या त्या मातोश्री होत्या.
स्व.चंद्रभागा खर्डे या अत्यंत मनमिळावू,प्रेमळ स्वभावाच्या म्हणून माहेगाव देशमुख आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.