निधन वार्ता
गृह विभागाच्या कर्मचाऱ्याचे अकस्मात निधन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे येथील रहिवासी व गृहविभागात सेवारत असलेले कर्मचारी अंकुश चांगदेव आहेर (वय -५०) हे तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री कर्तव्यावर असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यात त्यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचार सुरू असताना निधन झाले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक भाऊ,तीन मुले दोन बहिणी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.अंकुश आहेर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व कर्तव्यतत्पर म्हणून पोलिस विभागात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात परिचित होते.ते तालुका समादेशक या पदावर कार्यरत होते.त्यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
स्व.अंकुश आहेर हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व कर्तव्यतत्पर म्हणून पोलिस विभागात कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात परिचित होते.ते तालुका समादेशक या पदावर कार्यरत होते.त्यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्यावर चांदेकासारे येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी तालुका पोलिस विभागाने त्यांना मानवंदना दिली आहे.त्यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचेसह पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.