निधन वार्ता
…या शहरातील व्यापारी कोळपकर यांचे निधन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी व कासार समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते रामनाथ धोंडिबा कोळपकर (वय-९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचे पश्चात दोन मुले,चार मुली,चार भाऊ नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर कोपरगाव गोदावरी तीरी असलेल्या अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार संपन्न झाला आहे.त्यावेळी अनेक व्यापारी,समाजबांधव उपस्थित होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.