निधन वार्ता
भानुदास रोहमारे यांचे निधन
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावं येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व राजकीय तज्ञ भानुदास गबाजी रोहमारे (वय-८०) यांचे अल्पशा आजाराने दुपारी १२.४५ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
स्व.भानुदास पाटील रोहमारे हे अत्यंत अभ्यासू व राजकीय निरीक्षक म्हणून ओळखले जात.त्यांनी नितीन औताडे यांच्या राजकीय विचारांच्या उभारणीत मोठे योगदान दिले होते.अलीकडे त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या गटात ०६ वर्षापूर्वी प्रवेश केला होता.
ते पंधरा दिवसापासून आजारी होते.त्यांच्यावर शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू होते.काल दुपारी १२.४५ वाजता त्यांचा अंत्यविधी काल सायंकाळी ०६ वाजता पोहेगाव येथील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.त्यावेळी मोठी गर्दी होती.त्यांच्या पश्चात शरद रोहमारे,महेश रोहमारें,स्वाती राहुल शिनगर आदी मुले आहेत.ते माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ रोहमारे यांचे सहकारी म्हणून ओळखले जात.
त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आमदार आशुतोष काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य साईनाथ रोहमारे,चंद्रपंढरी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव औताडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.