निधन वार्ता
पुंजाबाई पवार यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील मूळ रहिवासी असलेले दत्तात्रय सुखदेव पवार यांची आई व पोहेगाव येथील चंद्रपंढरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक उत्तमराव औताडे यांच्या भगिनी गं.भा.पुंजाबाई सुखदेव पवार (वय-७५)यांचे आज सायंकाळी ५.२५चे सुमारास अल्पशा निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन नातू,तीन नाती असा परिवार आहे.
स्व.पूंजाबाई पवार या अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून निळवंडे आणि पोहेगाव परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर आज रात्री ८.३० वाजता पोहेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.त्यांच्यात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.