निधन वार्ता
ललिताताई गवळी यांचे निधन
न्यूजसेवा
अ.नगर (प्रतिनिधी)-
अ.नगर शहरातील आंदोलन व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड.कारभारी गवळी यांच्या पत्नी ललिताताई गवळी यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.त्या ६० वर्षाच्या होत्या.
त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.त्यांची मुलगी स्नेहल गवळी जर्मनीत डॉक्टर आहे.तर मुलगा ॲड.अमोल गवळी हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वकील आहे.
स्व.ललिताताई यांच्या पार्थिवावर सोमवारी दि.२२ जुलै सकाळी नालेगाव येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.