जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शिवाजी रोहमारे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचे पोहेगाव जिल्हा परिषद गटनेते शिवाजी माधवराव रोहमारे (वय-६७) यांचे काल दीर्घ आजाराने काल रात्री ८.३० वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,दोन बहिणी,चार मुली,एक मुलगा असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  

स्व.शिवाजी रोहमारे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची जिल्हाभर ओळख होती.त्यांनी पोहेगाव आणि परिसरात विविध सामाजिक कामासाठी कायम विविध आंदोलने केली होती.त्यांनी पोहेगाव खुर्द ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी या मागणीसाठी जानेवारीत २०२४ मध्ये ग्रामपंचायत समोर,’आमरण उपोषण’ केले ते त्यांचे शेवटचे आंदोलन ठरले आहे.

  स्व.शिवाजी रोहमारे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची जिल्हाभर ओळख होती.त्यांनी पोहेगाव आणि परिसरात विविध सामाजिक कामासाठी कायम विविध आंदोलने केली होती.त्यांनी पोहेगाव खुर्द ग्रामपंचायत स्वतंत्र व्हावी या मागणीसाठी जानेवारीत २०२४ मध्ये ग्रामपंचायत समोर,’आमरण उपोषण’ केले होते.ते त्यांचे शेवटचे आंदोलन ठरले आहे.त्यांना तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी सदर प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते.त्यांनतर त्यांची प्रकृती खालावत गेली होती.त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपयश आले आहे.त्यांची काल रात्री ८.३० वाजता प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्यावर आज सकाळी ९.३० वाजता पोहेगाव वैकुंठभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 

    त्यांच्या निधनाबद्दल शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,प्रमोद लबडे,माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,माजी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,गंगाधर रहाणे,रेल्वेचे माजी उपअभियंता बबनराव थोरात आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close