निधन वार्ता
भाऊसाहेब थोरात यांना मातृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी भाऊसाहेब सुखदेव थोरात यांच्या मातोश्री वेणूबाई सुखदेव थोरात (वय-८४) यांचे आज सकाळी ९.१० वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.वेणूबाई थोरात या स्वभावाने अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होत्या.पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती.अनेक दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या आज सकाळी ९.१० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात राज्य परिवहन मंडळाचे राहाता येथील बस स्थानक नियंत्रक रावसाहेब थोरात,गोरक्षनाथ थोरात आदींसह चार मुले व मंदाबाई बाळासाहेब गव्हाणे ही कन्या असा परिवार आहे.त्या जवळके विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या धर्मपत्नी तर शेतकरी माध्यमिक विद्यालयाचे ग्रंथपाल दत्तात्रय थोरात यांच्या चुलती होत्या.
त्यांच्यावर जवळके येथील अमर धाम येथे आज दुपारी २.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या निधनाबद्दल जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात,जलसंपदाचे माजी उपअभियंता सुखदेव थोरात,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच डी.के.थोरात,विजय थोरात,अण्णासाहेब भोसले,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सेनाचे मुंबई येथील कार्यकर्ते शिवाजी रहाणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.