निधन वार्ता
माजी मुख्यमंत्री जोशी यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक,सेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक,मुंबई चे माजी महापौर, माजी मुख्यमंत्री,लोकसभा अध्यक्ष असे पदे भुषवणारे मनोहर जोशी (सर) यांचे निधन झाले आहे.
तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी धुमाळ,भाजपा तालुकाध्यक्ष नंदकुमार विसाळ,सिताराम भांगरे,जालिंदर वाकचौरे व आम्ही धरणाचे भूमिपूजन केले असल्याचा दावा वाकचौरे यांनी केला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे निर्माते
अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष कै.किसनराव वरखिंडे,सरचिटणीस कै.सुरेश माने,कै.अप्पासाहेब पवार,राजेंद्र कोंढरे यांच्या मागणी वरून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठी महामंडळ स्थापन करून कै.अण्णासाहेब पाटील यांचे नावे महामंडळ करण्याची मागणीला संमती दर्शवून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी सन १९९८ मध्ये हे महामंडळ स्थापन केले होते.
संसद भवनात छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा व विधानभवनात राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मनोहर जोशी लोकसभा अध्यक्ष असताना तत्कालीन पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी जाणता राजा छत्रपती शिवराय यांचा संसदेच्या प्रांगणात अश्वारूढ पुतळा उभारला तर मुख्यमंत्री असताना विधानभवनात राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा लावली होती.असा मराठा समाजाला मदत करणारा मुख्यमंत्री हरपला असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठा महासंघ,उत्तर नगर जिल्हा प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.