निधन वार्ता
संजय गायकवाड यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर बिरोबा चौक येथील कार्यकर्ते संजय सुदाम गायकवाड यांचे नुकतेच वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे.गेल्या अनेक वर्षापासून ते मधुमेहाच्या आजाराशी झुंज देत होते.अखेर रविवार दि.२८ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी पंचक्रोशीतून मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

कै.संजय गायकवाड यांचा सामाजिक कार्यात सतत सहभाग होता.युवक कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात ते नेहमी अग्रभागी असत.मनमिळावून स्वभाव व सामाजिक कार्याची तळमळ यामुळे पंचक्रोशीत ते परिचित होते.प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यशस्वी जीवन ते जगले.
दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा,भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.अंत्यसंस्कारावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,उपसरपंच विवेक परजणे,लक्ष्मण साबळे याच्यासह अनेकांनी कै.गायकवाड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.