निधन वार्ता
बाळकृष्ण रुईकर यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी बाळकृष्ण चंद्रभान रुईकर (वय-५४) यांचे मंगळवार दि.३० जानेवारी रोजी पहाटे ४:१० वा.अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.ते अत्यंत हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
स्व.बाळकृष्ण रुईकर अत्यंत मन मिळावू स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे गोदावरीकाठी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.ते पत्रकार योगेश रुईकर यांचे चुलते होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.