निधन वार्ता
सोपान सावंत यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी स्वातंत्र्य सैनिक भाई सावंत यांचे पुतणे सोपान लक्ष्मणराव सावंत (वय-७२)यांचे आज दुपारी ०२ वाजता निधन झाले आहे.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ०७ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,एक भाऊ असा परिवार आहे.

स्व.सोपान सावंत हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित होते.त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात विद्युत विभागात कार्यरत होते.व ते दहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी ०७ वाजता कोपरगाव गोदावरी नदीकाठी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.