निधन वार्ता
ज्ञानदेव सांगळे यांचे निधन

न्यूजसेवा
कुंभारी-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव किसन सांगळे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी,दोन मुले आदी परिवार आहे.

स्व.ज्ञानदेव सांगळे हे स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे म्हणून कुंभारी व परिसरात परिचित होते.मयत सांगळे यांची आप्पासाहेब व संतोष सांगळे हि दोन्ही मुले हि कोपरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापारी आहे.
दरम्यान त्यांचा अंत्यसंस्कार गोदातीरी सोनारी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.यावेळी यावेळी आप्त स्नेही व मित्रपरिवार बहुसंख्या व्यापारी उपस्थित होते.त्यांच्या अशा अचानक जाण्याने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे व सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.