जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात गायी पळवणारी टोळी कार्यरत !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारतात गायीचे महत्व वादातीत आहे.तिला गोमाता म्हणूनही गौरवले जाते.तिचा शेतीत उपयोग हजारो वर्षांपासून होत आहे.असे असताना कोपरगाव शहरात एक गायी पळवणारी टोळी कार्यरत असून हि टोळी शहरातील गायींसह गुजरात येथून आलेल्या काठियावाडी गोरक्षकांच्या गायी पळवून त्या नजीकच्या बाजारात नेऊन खाटकांना विकत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून त्यातून माया गोळा करत आहे. विशेष म्हणजे हि टोळी राज्य सरकारच्या युवा संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे गोरक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेशी संपर्क साधून या बाबत चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाण्यात अशी एकही तक्रार आलेली नाही.आल्यास आपण कठोर कारवाई करू असे आश्वासित केले आहे.दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने मात्र या घटनेस दुजोरा दिला असून अशी घटना काही दिवसापूर्वी घडली होती मात्र त्यांनी आपापसात ती मिटवून घेतली आहे.मात्र संबंधित संघटनेत दोन गट असल्याने ते एकमेकांची जिरवा-जीरवी करत असल्याची पुष्टी जोडली आहे.

हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे. गोमूत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्त्व आहे.जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे.कारण गाय हा फक्त पाळीव पशू नसून तो एक उपयुक्त पशू आहे.गाईचे गोमूत्र,शेण,दूध,तूप,दही हे पंचामृत एक दिव्य औषध आहे,असे काही हिंदूंची समजूत आहे.गाय आपल्या आयुष्यात हजारो लोकांचे भरण पोषण करते.मात्र तिची हत्या मात्र फक्त काही जणांचे भोजन बनू शकते.

सुलतानी राजवटीत मोहम्मद तुघलकापासून ते मोगल बादशाह शहाजहानपर्यंतच्या काळात गोहत्याबंदी कायदा होता.कुतुबुद्दीन शहा,हैदरअली,टिपू सुलतान यांच्याही कालखंडात गोहत्या बंदी होती.परंतु इग्रजी राजवटीपासून गोहत्या होत गेली.भारतातील महाराष्ट्र राज्यात १९७६ पासून गोहत्याबंदीचा कायदा आहे.१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ गायीच्या नव्हे,तर बैलांच्या म्हणजेच गोवंशाच्या हत्येवर बंदी आणण्याचा कायदा केला.मात्र त्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नव्हती.पंधरा वर्षांनंतर राज्यात परत सत्तेवर आल्यानंतर युती सरकारने तातडीने राष्ट्रपतींची मंजुरी घेऊन हा कायदा लागू केला.आहे आता शिवसेनेचे महाआघाडी सरकार आहे.त्यांनीही या कायद्याला अद्याप हात लावलेला नसताना कोपरगावात मात्र विपरीत घडताना दिसत आहे.युवा संघटनेशी संबंधित दुय्यम दर्जाच्या एका पदाधिकाऱ्यांचा भाऊच यात गुंतला असून त्याने काठेवाडी गोपालक सध्या कोपरगाव परिसरात आपला गोवंश सांभाळतात त्यांच्या गायीवर वक्र दृष्टी ठेऊन त्या गायी पळविण्याचा सपाटा लावला असून या एखाद्या वाहनातून पळवलेल्या गायी वैजापूर,येवला,व तत्सम बाजारात जाऊन त्या गोवंश कत्तल करणाऱ्यांना विकल्या जात असून एका गायीपासून जवळपास तीस-चाळीस हजार रुपये कमावले जात असून या खरेदी केलेल्या गायी गोवंश कत्तल करणारे जवळपास एक लाखांच्यावर कमाई करत आहे.गत सहा ऑगष्ट रोजी नवीन औद्योगिक वसाहतीजवळ पाण्याच्या टाकीजवळ हि बाब उघड झाली असून एका छोट्या टेम्पोत हे काठियावाडी गुराखी आपल्या गायी सायंकाळच्या वेळी घरी म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन येत असताना एक जखमी असलेली व त्यामुळे मागे राहिलेली गाय हि टोळी एक टेम्पो घेऊन पळविण्यासाठीच्या प्रयत्नांत होती व मागच्या मागे त्यांनी ती टेम्पोत घातली असता हि खबर या गो-पालकास लागली त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हि उतरून घेतली असता हा प्रकार उघड झाला आहे.दरम्यान या गाय पळविणाऱ्या टोळक्याने हि आपण खरेदी केली असल्याचा बहाणा करून पाहिला पण तो मूळ मालकाचे समोर फार काळ टिकला नाही.अखेर त्याना काढता पाय घ्यावा लागला असल्याचे वृत्त आहे.दरम्यान गावातील गायीची बऱ्याच गायब झाल्याचे वृत्त असून या मागेही हि टोळी कार्यरत असल्याचे वृत्त आहे.दरम्यान या गोपालकाने या बाबत पोलीस कर्मचाऱ्यास या बाबत तक्रार देऊन पाहिली मात्र शहरातील एका सत्ताधारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने यात सहभाग घेऊन,”आमचा माणूस असा काही करणार नाही यात गैरसमज झाला”असल्याचा बहाणा करून या युवा पदाधिकाऱ्यांच्या भावास अभय दिले असल्याचे वृत्त आहे.त्यांनी या गोपालकावर दबाव आणून लेखी केलेली तक्रार मागे घ्यायला लावली आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाचा झेंडा धारण करून आपल्या स्वर्गवासी नेत्यास बदनाम करणारी टोळी कार्यरत आहे का ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.व या सत्तेत प्रमुख स्थानावर असलेल्या गटाचा नेमका रंग कोणता ? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ पाहत आहे.या प्रश्नी पोलिसानी चौकशी करून खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी गोरक्षक समितीने केली आहे.व सेनेच्या सरकारच्या काळात हा प्रकार घडला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close