न्यायिक वृत्त
…’त्या’ महिलेला आरोपींनी पेट्रोल टाकून जाळले!

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवनात शनिवार दि .०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी आरोपीच्या पत्नीने त्याच्या विरोधात विविध ठिकाणी दाखल केलेल्या विविध खटल्यांना वैतागून तिचा डाऊच बुद्रुक शिवारात खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याच्या प्रयत्नातील धारणगाव सोनार वस्ती येथील आरोपी संजय हिरामण मोहिते यास काल बेड्या ठोकल्या होत्या त्याला पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांच्यासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने ०६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.तर या खुनात सामील अन्य आरोपी हा मोहिते याच्या दुसऱ्या बायकोचा भाऊ असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान मयत महिला वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत (मोहीते) हिला तिची पोटगी देतो असे गोड बोलून तिला पुण्याला जायचे आहे असे सांगून आरोपी नवरा संजय मोहिते व त्याच्या लहान बायकोचा भाऊ तथा मेहुणा (नाव माहिती नाही) आदींनी आपल्या दुचाकीवर नेऊन तिला डाऊच बुद्रुक या ठिकाणी तिचा गळा दाबून खून करून त्यांच्या दुचाकी गाडीतील पेट्रोल काढून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवणात शनिवार दि.०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.ही घटना उघड झाल्यावर चांदेकसारे शिवारात खळबळ उडाली होतो.याबाबत चांदेकसारे येथील महिला पोलिस पाटील मीराबाई गोरक्षनाथ रोकडे (वय-५६) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.तो पासून शहर पोलिसांनी हा तपासासाठी शोध मोहीम राबवली होती.अखेर या तपासात पोलिसांना निर्णायक यश मिळाले आहे.त्यांनी मयत महिलेचा पती संजय मोहिते यास सावळीविहिर जवळून तो पळून जाण्याचा तयारीत असताना त्याला अटक केली होती.त्याला कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंभार यांनी आज कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समोर आरोपी संजय मोहिते यास हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायदंडाधिकारी जे.एस.केळकर यांनी त्यास ०६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान मुख्य आरोपीस संजय मोहिते यास मदत करणारा दुसरा आरोपी कोण हा प्रश्न अनुत्तरित होता.त्याचा शोध घेतला असता त्यांचेकडून पोलिसाने दुसऱ्या आरोपीचा तपास लावला असून तो नागपूर तथा विदर्भातून त्यास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पथकाने अटक केल्याची माहिती आहे.
दरम्यान मयत महिला वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत (मोहीते) हिला तिची पोटगी देतो असे गोड बोलून तिला पुण्याला जायचे आहे असे सांगून आरोपी नवरा संजय मोहिते व त्याच्या लहान बायकोचा भाऊ तथा मेहुणा (नाव माहिती नाही) आदींनी आपल्या दुचाकीवर नेऊन तिला डाऊच बुद्रुक या ठिकाणी तिचा गळा दाबून खून करून त्यांच्या दुचाकी गाडीतील पेट्रोल काढून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड होत आहे.त्यानंतर ते घटनास्थळावरून परागंदा झाले होते.मात्र पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यातील आरोपी संजय मोहिते हा का बेपत्ता झाला याचा शोध घेतला असता व त्याचे भ्रमणध्वनीचा ठिकाणा शोधला असता तो सावळीविहिर या ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्यास अटक केली आहे.त्याला आज कोपरगाव न्यायालयात हजर केले असता त्याला ही ०६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.आरोपीच्या वतीने ॲड.नितीन गंगावणे यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता प्रदीप रणधीर व शैलेश देसले यांनी काम पाहिले आहे.
दरम्यान मुख्य आरोपीस संजय मोहिते यास मदत करणारा दुसरा आरोपी कोण हा प्रश्न अनुत्तरित होता.त्याचा शोध घेतला असता त्यांचेकडून पोलिसाने दुसऱ्या आरोपीचा तपास लावला असून तो नागपूर तथा विदर्भातून त्यास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पथकाने अटक केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र त्याचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.अटकेनंतर ते उघड होणार आहे.
____________________________________________
*विश्वसनीय बातम्या *फ्री ‘न्यूजसेवा’* साठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*
https://bit.ly/newsseva2024
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी