जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

लौकीत वकिलाला गज काठीने मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील लौकी येथील मूळ रहिवाशी व कोपरगावात येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत असलेले वकील मच्छीन्द्र सुखदेव खिलारी (वय-६०) यांना व त्यांच्या मुलास,साक्षीदारस दुपारी चार वाजेच्या सुमारास लौकी शिवारातील गट क्रमांक १०८ मध्ये त्यांच्या शेतशेजारचे आरोपी कैलास संपत खिलारी,विलास संपत खिलारी, दिलीप संपत खिलारी, ऋषिकेश दिलीप खिलारी,मुकेश दिलीप खिलारी,योगेश कैलास खिलारी,संकेत विलास खिलारी, शैलेश विलास खिलारी आदी आठ जणांनी शेतीबाबत न्यायालयात चाललेल्या वादाच्या कारणावरून काल दुपारी चारच्या सुमारास स्टंप, काठी,व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

वकील मच्छीन्द्र खिलारी हे आपल्या शेतात काल बुधवार दि.११ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या जळालेल्या पेरूच्या बागेचा पंचनामा कारणासाठी तलाठ्याला घेऊन गेले होते.पंचनामा झाल्यानंतर ते आपल्या ग.नं.१०८ मधून आपल्या घरी जात होते.त्या दरम्यान वरील आठ आरोपी हे गज,काठ्या,स्टम्प घेऊन आले व त्यांनी फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांना स्टम्पने मारहाण केली असून व त्यांचा मुलाच्या कानास चावा घेतला आहे.व साक्षिदार यांना शेती बाबत कोर्टात चाललेल्या दाव्याच्या कारणावरून गज,काठ्यांनी मारहाण केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत हद्दीतील मूळ रहिवाशी असलेले मात्र वकिली व्यवसायानिमित कोपरगाव शहरातील इंदिरा पथ मार्गावरील गौरी शंकर हौसिंग सोसायटीतील रहिवाशी मच्छीन्द्र खिलारी हे कोपरगाव न्यायालयात आपला वकिली व्यवसाय करतात.त्यांची आपल्या लौकी गावात शेती आहे त्यांचा व शेजारचे शेतकरी यांचा जमिनीच्या कारणावरून वाद आहेत.त्याबाबत कोपरगाव न्यायालयात दावेही चालू आहेत.दरम्यान मच्छीन्द्र खिलारी हे आपल्या शेतात काल बुधवार दि.११ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या जळालेल्या पेरूच्या बागेचा पंचनामा कारणासाठी तलाठ्याला घेऊन गेले होते.पंचनामा झाल्यानंतर ते आपल्या ग.नं.१०८ मधून आपल्या घरी जात होते.त्या दरम्यान वरील आठ आरोपी हे गज,काठ्या,स्टम्प घेऊन आले व त्यांनी फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांना स्टम्पने मारहाण केली असून व त्यांचा मुलाच्या कानास चावा घेतला आहे.व साक्षिदार यांना शेती बाबत कोर्टात चाललेल्या दाव्याच्या कारणावरून गज,काठ्यांनी मारहाण केली आहे.तसेच फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांच्या वाहनाचे नुकसान करून दाव्याचे कागदपत्र फाडून टाकले आहे.

दरम्यान कोपरगाव वकील संघाने जेष्ठ वकील व वकील संघाचे माजी अध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी यांना आरोपीनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव वकील संघाच्या कार्यालयात शुक्रवार दि.१३ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे यांनी दिली आहे.

या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसानी रात्री उशिरा गु.र.नं.१८४/२०२० भा.द.वि.कलम ३२४,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close