जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोपरगाव पोलिसांनी केले फरार चौदा आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या हद्दीतील फरार आरोपीना पकडण्यासाठी राबविण्यात आलेल्या छाप्यात कोपरगाव शहराच्या विविध भागातील चौदा आरोपीना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.त्यामुळे फरार आरोपींमध्ये कोपरगाव शहर पोलिसांची दहशत पसरली आहे.

अटक केलेल्या आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ प्रमाणे एक कारवाई करण्यात आली आहे.तर कलम १०९ सी.आर.पी.सी.प्रमाणे एक कारवाई करण्यात अली आहे.यात पोलिसानी जामीनपात्र चार वारंटची बजावणी केली असून एकूण सतरा समन्स बजावले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. दरम्यान या कारवाईसाठी एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक,तेरा पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुंह्यातील सुमारे आठ आरोपी फरार होते ते पोलिसांना मिळून येत नव्हते.त्यामुळे कोपरगाव पोलिसानी दोन अधिकारी व १३ पोलीस कर्मचारी यांची एक गुप्त मोहीम राबवून मंगळवार दि.१० मार्च रोजी रात्री अकरा वाजे नंतर ते ११ मार्च पहाटे ४ वाजे पर्यंत विविध ठिकाणी धाडी घालून त्यात गणेश कचरू लोखंडे,(वय-२३)रा.कोल्हे वस्ती कोपरगाव,महेश उर्फ शैलेश सर्जेराव शेलार,(वय-१८) रा.आढाव वस्ती कोपरगाव,चेतन सुनील शिरसाठ (वय-२२) रा.निवारा,आदित्य रवींद्र गरुड (वय-२२) गांधीनगर,अभिषेक वसंत शिंदे,(वय-२१) रा.गांधीनगर,विशाल रामानंद पिंगळे,(वय-२१) रा.निवारा,दत्त शांताराम साबळे,(वय-२६) रा.टाकळी नाका, राहुल सोमनाथ गायकवाड,(वय-२२)रा.संजयनगर सर्व रा.कोपरगाव आदींना अटक केली आहे.

दरम्यान आणखी अजामीन पात्र वारंट असलेल्या व १० हव्या असलेल्या आरोपीना वारन्ट बजावणी करून त्यातील सहाजण गजाआड केले आहे.त्यात सुनील बाबुराव मोकळं,(वय-२५) रा.खडकी,ज्ञानेश्वर उर्फ पिंट्या फकिरा पवार,(वय-३५) रा.मुर्शतपुर,डोंगऱ्या शिवराम चव्हाण,(वय-२५) रा.लक्ष्मीनगर,राहुल राजेंद्र कोपरे,(वय-३८) रा.टिळकनगर,इम्रान कौसर शेख,(वय-३०)रा.ओमनगर,अनिल राजू कांबळे,(वय-२५) रा.टाकळी सर्व ता.कोपरगाव येथील असून या सहा जणांना अटक करण्यात यश मिळाले आहे. दरम्यान आणखी जबरी चोरीच्या गुन्ह्यात असलेले सात आरोपीपैकीं हद्दपार असलेला आरोपी देवा उर्फ देविदास रंगनाथ लोखंडे,रा.तीनचारी,याचा शोध घेतला असता तो पोलिसांना मिळून आला नाही.या सर्व आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ प्रमाणे एक कारवाई करण्यात आली आहे.तर कलम १०९ सी.आर.पी.सी.प्रमाणे एक कारवाई करण्यात अली आहे.यात पोलिसानी जामीनपात्र चार वारंटची बजावणी केली असून एकूण सतरा समन्स बजावले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक राकेश मांगावकार यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. दरम्यान या कारवाईसाठी एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक,तेरा पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे त्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close