नगर जिल्हा
पत्रकार मते,व्यंगचित्रकार भागवत यांना पुरस्कार प्रदान
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
कला व पत्रकारिता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल आकाशवाणीचे निवेदक संतोष मते व पत्रकार, व्यंगचित्रकार रवी भागवत यांना सर्व्हिस फाउंडेशन व महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणच्यावतीने ‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समानचिन्ह, पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
येथील शुभम सांस्कृतिक भवनामध्ये पार नुकत्याच पार पडलेल्या समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुणे येथील साद माणुसकीची फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश बुटले, नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडूभभाऊ काळे यांच्या हस्ते तर आचार्य शुभम महाराज कांडेकर, विजय वरूडकर, बबन तागड, गणेश नरसाळे, प्रशांत खांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना मते म्हणाले, आपले दैनंदिन काम करताना अनेक लोक भेटतात. त्यांच्यातील चांगले गूण आपल्याला प्रेरीत करतात. त्यामुळे प्रत्येक जण समाजकार्यात ओढला जातो. मीही अनेकांपासून प्रेरणा घेऊन थोडेफार समाजिक काम करतो. आज झालेल्या सन्मानामुळे आता आणखी सामाजिक होण्याची जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष सुरज सुर्यवंशी व महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणचे रामपाल पांडे, चित्रकार भरकुमार उदावंत, ग्रामीण कवी आनंदा साळवे, अशोकराज आहेर, विजय कुदळे, लक्ष्मण निकम, लहानबाई मते, संजिवनी मते, मिनल भागवत, गायत्री म्हस्के, राजेंद्र म्हस्के, राजेंद्र उदावंत, भाऊसाहेब बनकर आदी उपस्थित होते.