जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलास पळवले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायत हद्दीत गांजेवाडी येथील रहिवासी असलेल्या महिलेचा मुलगा संदीप शिवाजी जाधव (वय-१७) यास अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने पळविले असल्याचा गुन्हा कोपरंगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हरविलेल्या तरुणांचा फोटो.

फिर्यादी महिला रंजना जाधव या शेतकरी महिलेचे कुटुंब आपले पती,मुलगा,आजी असे रहिवासी असून त्याचा मुलगा संदीप जाधव हा दि.१७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाला आहे.तो आपल्या आईला,”मी,मुर्शतपूर फाट्यावरून जाऊन येतो” असे सांगून गेला होता.तो परत आलाच नाही त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

वर्तमानात ओला दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहे.शेतकरी पावसाने हैराण झाले आहे.त्यातच कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे.संवत्सर शिवारात दरोडा,त्या पाठोपाठ चासनळी येथील मोठी चोरी झाली आहे.त्यामुळे शेतकरी भीतीच्या सावटात जीव मुठीत धरून बसले आहे.महागाई आवाक्याच्या बाहेरच चालली आहे.त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट दत्त म्हणून हजर झाले आहे.ते मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कोपरगाव नजीक असलेल्या मुर्शतपुर शिवारात असलेल्या गांजापूर येथील फिर्यादी महिला रंजना जाधव या शेतकरी महिलेचे कुटुंब आपले पती,मुलगा,आजी असे रहिवासी असून त्याचा मुलगा संदीप जाधव हा दि.१७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाला आहे.तो आपल्या आईला,” मी,मुर्शतपूर फाट्यावरून जाऊन येतो” असे सांगून गेला होता.तो परत आलाच नाही.त्यास कोणी घेऊन गेले की तो स्वतःच्या मर्जीने गेला हे समजायला मार्ग नाही.मात्र सदर मुलाची आई रंजना शिवाजी जाधव (वय-३५) हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात,” सदर मुलगा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरिता पळवुन नेला” असल्याचे म्हटलं आहे.या प्रकरणी तिने गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२९२/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close