नगर जिल्हा
निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक – डॉ.चोपडा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
भारतीय माणसाच्या जीवनात विविध रासायनिक औषधे व रासायनिक खते यांचा बेसुमार मारा असलेले खाद्य पदार्थ यांचा मारा वाढला असून आता निरोगी जीवनासाठी सेंद्रिय भाजीपाला व व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने श्री. सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयांत माजी आमदार अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव यांचे वतीने प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मनोज चोपडा यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे होते.
त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले की,जीवनात असलेल्या ताणतणावामुळे आरोग्यावर होणारे दुष्पपरिणाम कसे टाळता येवू शकतात याबाबत त्यांनी चित्रफित दाखवून मार्गदर्शन केले. आरोग्याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली. आहारात मिठ प्रमाणात घेवून रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.विविध रसायनांच्या वाढत्या वापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले असून ताणतणाव विरहीत जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपले छंद जोपासले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी शेवटी केले आहे.
माणसाने आहारात मिठ प्रमाणात घेवून रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.विविध रसायनांच्या वाढत्या वापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले असून ताणतणाव विरहीत जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आपले छंद जोपासले पाहिजे.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, विजय आढाव, संदीप वर्पे, सुनील गंगूले, सुनील बोरा, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे छोटूभाई जोबनपुत्रा, विजय बंब, योगतज्ञ शहा, राजेंद्र आभाळे, फकीरमामू कुरेशी, राजेंद्र खैरनार, चंद्रशेखर म्हस्के, मुकुंद इंगळे, निखील डांगे, तेजस साबळे, आदर्श पठारे, आकाश विदुर आदी मान्यवरांसह प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.