जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

श्रीरामपूर पालिकेने राबविली संपगृहाची स्वच्छता मोहीम

जनशक्ती न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

श्रीरामपुर शहराला करण्यात येणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी येत होत्या.त्यावर नगरपालीकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शहरातील आठ पाण्याच्या टाक्या व दोन संपगृह स्वच्छ करण्यात आले असून पाच ते सहा मीटर खोल असलेल्या दोन संपगुहा मधुन सुमारे पन्नास ते साठ हजार लीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे.त्यामुळे नागरीकांना स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जलशुद्धीकरण केंद्रातील एकमेकांना जोडलेले प्रत्येकी सहा लाख लीटरचे दोन संप व शहरातील आठ जलकुंभ स्वच्छ करण्यात आले.दोन संपगुहा मधून सुमारे पन्नास ते साठ हजार लीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे,वर्षातून किमान दोन वेळेस संपगृह स्वच्छ करण्याची गरज आहे-मनोज कुमार,शहर अभियंता

श्रीरामपुर शहरातील नागरीकांना मध्यंतरीच्या काळात गाळमिश्रीत पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या.त्यावर नगरपालीकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मनोज कुमार ईश्‍वरकट्टी यांनी तपासणी केली असता जलशुद्धीकरण केंद्रातील एकमेकांना जोडलेले प्रत्येकी सहा लाख लीटरचे दोन संप व शहरातील आठ जलकुंभ स्वच्छ करण्यात आले.दोन संपगुहा मधून सुमारे पन्नास ते साठ हजार लीटर गाळ बाहेर काढण्यात आला आहे.वास्तविक संपगृह व पाणीसाठवण करणारे जलकुंभ किमान वर्षातुन एकदा तरी स्वच्छ केले गेले पाहीजे.मात्र या बाबत यापुर्वी अशी कार्यवाही झाली किंवा नाही याबाबत माहीती उपलब्ध होऊ शकली नाही.मात्र अशा प्रकारच्या सच्छतेसाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी नागरीकांच्या तक्रारींची दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्वच्छतेची कार्यवाही पुर्ण केली आहे.त्यामुळे किमान जलशुद्धीकरण केंद्र ते पाणी साठवण जलकुंभापर्यंत शुद्ध पाणी जाणार आहे.मात्र पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी कुठे लीक झाल्यास किंवा पाणी चांगल्या दाबाने मिळावे म्हणुन नागरीकांनी खड्डा खणलेला असेल आणि नळाला तोटी नसेल तर पावसाचे खड्यात साठलेले पाणी जलवाहीनीत जाऊन खराब पाणी येऊ शकते.मात्र आता नागरीकांना स्वच्छ पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान पाणीपुरवठा विभागाने शनिवार व रविवार दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेऊन दोन दिवसात सच्छतेचे काम पुर्ण केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close