जाहिरात-9423439946
करमणूक

कोपरगावच्या चित्रपट लेखकाचा डंका थेट अमेरिकेत!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

आपल्या कोपरगांवच्या लेखक युवकाची फिल्म देशा “पल्याड” धुमाकुळ घालतेय.विश्वास बसत नाही ना ! पण ही बातमी खरी आहे.
ऐतिहासिक आणि कला क्षेत्राशी नाळ जोडलेल्या कोपरगांव शहरातील युवकाच्या नावाची थेट अमेरिकेत होत आहे चर्चा होत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींच्या हाती आली आहे.

आपल्या कोपरगावचे व “पल्याड” चित्रपटाचे लेखक सुदर्शन खडांगळे हे मास- कम्युनिकेषण संज्ञापण विभाग अ.नगर न्यु आर्टस्चे विद्यार्थी आहे. या आधी अनेक मराठी- हिंदी चित्रपटा मध्ये बॅकस्टेज काम करण्याचा दान्डगा अनुभव पाठीशी घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत झेप घेतलीय लेखक म्हणुन त्याची अनेक फिल्म, शॉटफिल्म,नाटक,सिरियल.या मध्ये आजतागायत सहभाग नोंदवलाय.नुकतीत मायबोली मराठी वर प्रदर्शित होत असलेली ‘आर्विक प्रोड़क्शन’ ची मालिका “माझा ज्ञानोबा” या मालिकेचे हे सह.लेखक तसेच नाशिक जिल्हा ऑल इंडियॉ आर्टीस्ट प्रोड्युसर अँड टेक्निशियन युनियनचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत.

सदरचे सविस्तरचे वृत असे की,”कोपरगांव येथील रहीवासी लेखक दिग्दर्शक सुदर्शन दिलीप खडांगळे या युवकाची मराठी फिल्म “पल्याड” टाळेबंदीच्या मध्ये कठीण परीस्थितीत तयार झाली त्या नतंर अनेक प्रतिष्ठीत फिल्म फेस्टिवेल मध्ये पारितोषीक मिळवून जेव्हा फिल्म अमेरिका,चिन,दक्षिण कोरीया,भुतान,न्युयॉर्क,स्पेंन,लडंन,हॉंगकॉंग, टोरंटो,टोकीयों,सिक्कींम,नवी दिल्ली, कोलकत्ता,तमिलनाडू,ढ़ाका,मुबई,स्विड़न, यु.एस.अे.अशा अनेक ठीकानी फेस्टिंवेल द्वारे स्क्रींनिंग करण्यात आली चित्रपटाचा चालु असलेला हा प्रवास कोपरगाव करांसह राज्याला थक्क करणारा आहे. “पल्याड” मराठी चित्रपटसृष्टीचे तसेच आपल्या देशाचे विदेशी भुमित प्रतिनिधीत्व सक्षमरित्या पार पाडतोय.अवार्डस् मिळवतोय.अशा अनेक ठीकानी राष्ट्रीय,आतंरराष्ट्रीय,विदेशात जाऊन धुमाकुळ घालत आहे.चर्चा तर तेव्हा वाढली जेव्हा अमेरिकेच्या च नव्हे तर जगातल्या सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हॉलिवूड अँड इंटरमेन्ट इंडस्ट्री मधील “फॉर्ब्स” आणि ‘सिनेक्वेस्ट’ या “ऍडव्हान्समेंट अँड न्युज”या  संस्थे ने देखील “पल्याड” (द ऑदर साईड) चित्रपटाची दखल घेतली.


या ऐतिहासिक घटनेची नोद घेतली.आणि पल्याड ची चर्चा जगभरात व्हायला लागली व “पल्याड” जगाच्या काना-कोपर्यात जाऊन पोहचली आहे
अशा या “पल्याड” फिल्म चा तयार होण्याचा प्रवास काही सोपा नव्हताच.टाळेबंदीच्या काळात पहील्या लाटेत चंद्रपुर येथे सुरु असलेले चित्रीकरण अर्धवट बंद पडले. तरी ना उमेंद होत ‘पल्याड’ टीम ने पुन्हाः त्याच जोंमाने चित्रपटाचे चित्रीकरण निर्बध हटल्यानतंर पुर्ण केले.अनेक अडचनी येऊन देखिल चित्रपट तयार झाला. त्या नतंर मात्र “पल्याड” कुठे थांबलाच नाही.अनेक ठिकाणी पारितोषीक मिळालेय मिळवत आहे.आणि कौतुक ही होतय.हा विजयी रंथ आजतागायत चालुच आहे.चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात ४ नोव्हेबंर ला प्रदर्शीत होतोय.तो पर्यन्त अशा अनेक फेस्टिवेल मध्ये बेस्ट फिल्म अवार्ड घेतच राहील हा विश्वास निर्मात्यांना आहे.हे यश एकटयाचे नसुन सपुर्ण “पल्याड” टीम आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या “पल्याड” शी जोडल्या गेलेल्या त्या प्रत्येक प्रामाणिक व्यक्ती चे आहे असे लेखक सुदर्शन खडांगळे बोलत होते.तसेच
“एलिवेट फिल्मस्” आणि “लावण्याप्रिया आर्टस्” यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पल्याड’ या मराठी सिनेमाची निर्मिती झाली आहे. चित्रपटाचं शूटिंग चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही,मरेगांव,कुकडहेटी,चिकमारा,शिवनी, राजोली,घोट या ग्रामिण भागात पार पडले आहे. “पल्याड” हा सामाजिक विषयाला भाष्य करणाऱ्या एका परिवारात घडलेल्या काही कडू-गोड गोष्टीवर आधारीत संवेदनशील चित्रपट आहे.


“पल्याड” या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रपुर शहरातील सुपुत्र शैलेश भिमराव दुपारे एफ.टी.आय.आय (FTII) मध्ये दिग्दर्शनाचे प्राविण्य मिळवलेल्या मराठमोळ युवकाने केलय तर चित्रपटाची कथा कोपरगाव येथील लेखक सुदर्शन खडांगळे यांनी लिहीली आहे. तसेच चित्रपटातील उत्कृष्ठ आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी पटकथा- संवाद लेखक सुदर्शन खडांगळे व शेलेश दुपारे यानी लिहीलीय. या चित्रपटा मध्ये २५ लोंकाची तांत्रिक संघ अहोरात्र काम करत होता. सगळे मिळून ७५ लोंक या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात नॅशनल फिल्म अँवार्ड विजेते शंशाक शेंडे,नाळ चित्रपटातील चैत्याच्या ‘आई’ ची भुमिका साकारलेल्या अभिनेत्री देविका दफतरदार,’माझ्या नवऱ्याची बायको’ सिरियल मधिल देवेद्र दोडके,’कोर्ट’ चित्रपटातले विरा साथीदार,सायली देठे,गजेश कांबळे,भारत रंगारी,रवि धकाते,आणि चंद्रपुर जिल्हातील बल्लारपुरच्या नवोदित बालकलाकार रुचित निनावे याला संधी देण्यात आली आहे. छायाकंन-मोहर माटे,वेशभुषा-विकास चहारे, मेकअप-स्वप्निल धर्माधिकारी,कला दिग्धदर्शन- अनिकेत परसावर,ऐड़ीटींग-मनिष शिर्के यानी केलय.चित्रपटात ४ गाणी असून चित्रपटाची गाणी अरुण सागोंळे व प्रंशात मडपुवार यांची असून संगीत दिग्दर्शन जगदीश गोमिला व सॅम.ए.आर,तुषार पारगावकर,ह्यांनी दिलंय. चित्रपटाचे वितरक के.सेरा सेरा हे चित्रपटाचं मार्केटींग म्हणुन काम पाहत आहे.तसेच
आपल्या कोपरगावचे व “पल्याड” चित्रपटाचे लेखक सुदर्शन खडांगळे हे मास- कम्युनिकेषण संज्ञापण विभाग अ.नगर न्यु आर्टस्चे विद्यार्थी आहे. या आधी अनेक मराठी- हिंदी चित्रपटा मध्ये बॅकस्टेज काम करण्याचा दान्डगा अनुभव पाठीशी घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत झेप घेतलीय लेखक म्हणुन त्याची अनेक फिल्म, शॉटफिल्म,नाटक,सिरियल.या मध्ये आजतागायत सहभाग नोंदवलाय.नुकतीत मायबोली मराठी वर प्रदर्शित होत असलेली ‘आर्विक प्रोड़क्शन’ ची मालिका “माझा ज्ञानोबा” या मालिकेचे हे सह.लेखक तसेच नाशिक जिल्हा ऑल इंडियॉ आर्टीस्ट प्रोड्युसर अँड टेक्निशियन युनियनचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत.लवकरच.त्यांच्या ‘स्केनारीओ फिल्म प्रॉडक्शन’ मध्ये अगामी येणाऱ्या त्यांच्या पहील्या दिग्दर्शनासाठी असलेल्या नविन मराठी चित्रपटाचे प्री.प्रोड्क्शनचे काम नाशिक येथे लवकरच सुरू होईल त्यांत आपल्या भागातील कलांकाराना सधी देणार असल्याचे ते आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सागत होते.अशा या प्रतिभावंत कलाकाराला त्यांच्या पुढील वाटचालीस “जनशक्ती न्यूजसेवाच्या”मनपुर्वक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close