नगर जिल्हा
जिल्हा लीगल सेलच्या संघटकपदी अड्.कावेरी पवार यांची निवड
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील माहेर असलेल्या मात्र आता पुण्यात स्थायिक झालेल्या अड्.कावेरी बाजीराव पवार(गुरसळ) यांची नुकतीच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलच्या संघटकपदी निवड झाल्याचे पत्र या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अड्.यशवंतराव शिंदे यांनी दिले आहे.त्यांच्या या निवडीचे नगर व पुणे जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
अड्.कावेरी पवार या पुणे येथील न्यायालयात आपली विधी सेवेसंबंधी कर्तव्य बजावत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार कराल असा जिल्हाध्यक्ष अड्.यशवंतराव शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.अड्,कावेरी पवार या डाऊच खुर्द येथील कार्यकर्ते किशोर गुरसळ यांच्या भगिनी आहेत.