जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

डाँ. सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल

नाराज दिलीप गांधीची उपस्थिती.

जाहिरात-9423439946

अहमदनगर – राज्याचे लक्ष वेधलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विशेष म्हणजे खासदार दिलीप गांधी यांची उपस्थिती होती. त्यामुळे गांधींच्या नाराजी नाट्यावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे. तसेच संपदा मंत्री गिरीश महाजन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचीही उपस्थिती होती.
विशेष म्हणजे नाराज असलेले विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी यांचेही सूचक म्हणून एका अर्जावर नाव होते. भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून नाराज नसल्याचे खासदार गांधी म्हणाले. मात्र, त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्या उमेदवारीवर छेडले असता याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य गांधी यांनी केले.

रॅलीला सकाळी ११ वाजतापासून युतीने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली आहे. रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी डॉ. सुजय विखे यांनी ग्रामदैवत गणपतीची आरती करुन दर्शन घेतले. त्यानंतर ते रॅल्लीत सहभागी झाले. रॅलीदरम्यान महादेव जानकर आणि राम शिंदे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधून प्रचाराच्या नीतीबद्दल माहिती दिली. यावेळी दोघांनाही बोलताना उमेदवार डॉ. सुजय विखे हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. राम शिंदे यांनी, आता पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती या मतदारसंघात होणार नाही. यावेळी शरद पवार यांचा उमेदवार निश्चित पराभूत होणार असून युतीचे उमेदवार सुजय विखे हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

महादेव जानकर यांनी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची जागा राज्यात दिली नसली, तरी आम्ही देशभरात ११० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राज्यात उमेदवार नसला, तरी मी नाराज नाही, विधानसभा निवडणुकीत आम्हाला समाधानकारक जागा मिळतील, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातही आपण प्रचार करणार असल्याची माहिती जानकर यांनी यावेळी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close