नगर जिल्हा
युती नसेल तर शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार-माजी खा.लोखंडे

न्युजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत मित्र पक्षांची युती झाली तर ठीक नाही तर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वबळावर लढणार आहे असल्याचे सुतोवाच माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीतील एका बैठकीत केले आहे.

“तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोहचवण्यासाठी शिवसेनेची सदस्य नोदणी अभियानाचा उद्देश असून त्यांनी जे निर्णय घेतले जनतेपर्यंत जावे त्याचा सामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे.शिंदे हे १८ तास काम करणारे नेते आहे लाडकी बहिण,शेतकरी,बेरोजगार यांना न्याय दिला आहे”- अजय बोरस्ते,माजी महापौर,नाशिक महानगरपालिका.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे,अनेक मंत्रिमंडळ बैठकीला त्यांची अनुपस्थिती दिसून आली होती,तर आपल्या साताऱ्यातील दरेगावातील मुक्कामही वाढला होता.यानंतर,आता ते शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात सक्रिय झाले असून विरोधकांना थेट इशारा देत आहेत.”मला हलक्यात घेऊ नका,ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा असे म्हणत आहेत.त्यामुळे,एकनाथ शिंदेंचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे,विरोधकांसाठी की सत्तेतील सहकाऱ्यांसाठी याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना शिर्डीत त्यांच्या समर्थक माजी खा.सदाशिव लोखंडे यांनी शिवसेना सदस्य नोंदणी सुरू करण्यासाठी एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सुर आळवला असल्याचे बोलले जात आहे.

सदर प्रसंगी आ.विठ्ठलराव लंघे,आ.राहुल खताळ,माजी आ.भाऊसाहेब कांबळे,शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,नितीन औताडे,नाशिकचे माजी महापौर अजय बोरास्ते,महिला आघाडीच्या विमल पुंडे,सुनीता शेळके आदी सह विविध मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी माजी खा.लोखंडे म्हणाले की,”आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मित्र पक्षात युती झाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वबळावर लढणार आहे.जो पक्ष निर्णय देईल त्यानुसार काम करू असे सांगताना त्यांनी स्थानिक अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेबद्दल बोलताना सांगितले की,”राहाता,कोपरगाव,श्रीरामपूर येथे अतिक्रमण कारवाई झाली आहे.ज्या दुकानदारावर अन्याय झाला त्याचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे जहित केले आहे.
सदर प्रसंगी नाशिक महानगर पालिकेचे माजी महापौर अजय बोरास्ते म्हणाले की,”तळागाळापर्यंत शिवसेनेचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोहचवण्यासाठी शिवसेनेची सदस्य नोदणी अभियानाचा उद्देश आहे.त्यांनी जे निर्णय घेतले जनतेपर्यंत जावे त्याचा सामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे.शिंदे हे १८ तास काम करणारे नेते आहे लाडकी बहिण,शेतकरी,बेरोजगार यांना न्याय दिला आहे.सामान्य माणसाच्या वेदना त्याना माहिती आहे.एकनाथ शिंदे याची शिवसेना खरी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर काम करणारी शिवसेना ठरली आहे .त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सदस्य नोदणी होईल असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष नितीन औताडे म्हणाले की,’प्रत्येक तालुक्यात ३० ते ३५ हजार व शिर्डी लोकसभा मतदार संघात दिड ते दोन लाख सदस्य नोंदणी साठी शिवसेनेचे पदाधिकारी एक विचाराने काम करतील असा विश्वास शेवटी व्यक्त केला आहे.