आंदोलन
कोपरगावात…या कारणाने ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात सोमवार दि.१२ जून रोजी सकाळी ११ वाजता नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या युवकाची हत्या केल्या प्रकरणी राग धरून असामाजिक तत्वांनी हत्या केल्याच्या घटनेसह विविध चार मागण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कोपरगाव तहसील कार्यालयापर्यंत आंबेडकरी चळवळीच्या वतीने,’जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन केले असल्याची माहिती आर.पी.आय.चे माजी शहराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावातील दलित तरुण अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली आहे.लग्नाच्या वरातीत ०१ जून रोजी हा प्रकार घडला आहे.गावातील मराठा तरुणांनी ‘गावात भीम जयंती साजरी करता का ?’ असा सवाल विचारत काही असामाजिक तत्त्वांनी त्यास लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.त्यानंतर खंजर आणि तलवारीच्या सहाय्याने अक्षय याची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली गावातील दलित तरुण अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली आहे.लग्नाच्या वरातीत ०१ जून रोजी हा प्रकार घडला आहे.गावातील मराठा तरुणांनी ‘गावात भीम जयंती साजरी करता का ?’ असा सवाल विचारत काही असामाजिक तत्त्वांनी त्यास लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.त्यानंतर खंजर आणि तलवारीच्या सहाय्याने अक्षय याची भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.अक्षय याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामिण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीमध्ये,वरातीत नाचण्यावरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे म्हटले आहे.दरम्यान,अक्षयच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अॅट्रोसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल केले असून ०७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरु आहे.दरम्यान दलित समाजामध्ये या हत्येचा तीव्र प्रक्षोभ दिसून येत आहे.समाजमाध्यमांवरही या हत्येवरुन तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.त्याचे पडसाद कोपरगाव शहरात उमटले असून त्या विरोधात तहसील कार्यालयावर सोमवार दि.१२ जून रोजी,’जनआक्रोश मोर्चा’ आयोजित केले आहे.
दरम्यान या मोर्चात बौद्ध समाजातील अभियंता पदाचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा बलात्कार करून हत्या केली आहे.व्याजाचा केवळ ०३ हजार रुपयांच्या रकमेपोटी गिरीधर तबकाले यांचा निर्घृण खून केला आहे.नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मातंग समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली त्या सर्व कुटूंबांना मारहाण केली असल्याचे कारण दर्शविण्यात आले आहे.या सर्व घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित केला असल्याचे त्यांनी शेवटी रणशूर यांनी सांगीतले आहे.