जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

गणेशच्या सभासद व कामगारांची पिळवणूक…हे नेते थांबवणार-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला गणेश सहकारी साखर काखान्याची निवडणूक सुरु झाली असून त्याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या उमेदवाराच्या प्रचार नारळ गुरुवार दि.०८ जून रोजी रोजी सायंकाळी ५.३० वाजता खंडोबा मंदिर वाकडी येथे फोडला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“सहकारात गेल्या कित्येक दशकांपासून विशिष्ट लोकांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामगारांची व सामान्य जनतेची लूट सुरु ठेवली आहे.तसेच त्यांचे आर्थिक शोषण करूनही गणेश सह जिल्ह्यातील इतर सहकार सातत्याने शेकडो कोटी रुपये तोट्यात दाखवले जात आहे.याबाबत शेतकरी संघटनेचे अड्.अजित काळे यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थेत कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढाया लढून कुठलाही पै-पैसा न घेता शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय मिळवून दिला आहे”-अनिल औताडे,जिल्हाध्यक्ष,शेतकरी संघटना.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुक संपन्न होत असून याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे.हा सामना तिरंगी होत असून यात राज्याचे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचा जनसेवा,माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळाचे विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी दंड थोपटले आहे.शेतकरी संघटनेचे ०८ उमेदवारांचा पॅनल रिंगणात आहे.तर कोल्हे गटाच्या एका उमेदवारांची वेळेत माघार न झाल्याने तो उमेद्वारही अपक्ष म्हणुन रिंगणात आहे.१९ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.त्यासाठी विविध गटांनी आपला प्रचार करण्यास प्रारंभ केला आहे.शेतकरी संघटना या बाबत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या शुभ हस्ते शेतकरी संघटनेच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ खंडोबा मंदिर वाकडी येथे सायंकाळी ५.३० वाजता वाढवला जाणार आहे.यासाठी गणेश कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक कामगार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे यांनी दिली आहे.

सहकारात गेल्या कित्येक दशकांपासून विशिष्ट लोकांनी सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामगारांची व सामान्य जनतेची लूट सुरु ठेवली आहे.तसेच त्यांचे आर्थिक शोषण करूनही गणेश सह जिल्ह्यातील इतर सहकार सातत्याने शेकडो कोटी रुपये तोट्यात दाखवले जात आहे.याबाबत शेतकरी संघटनेचे अड्.अजित काळे यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थेत कायदेशीर मार्गाने न्यायालयीन लढाया लढून कुठलाही एक रुपयाचा पै-पैसा न घेता शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.तरी मोठ्या संख्येने वाकडी येथे खंडोबा मंदिर प्रांगणात प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अनिल औताडे यांनी केले आहे.

सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रुपेंद्र काले,कामगार नेते रमेश देशमुख,सामाजिक कार्यकर्ते व निळवंडे कालवा कृती समितीचे ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जवरे,संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्यकारणी सदस्य दशरथ गव्हाणे, शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे,राहाता शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश मोरे,श्रीरामपूर तालुका युवराज जगताप,जेष्ठ कार्यकर्ते सुदामराव औताडे,राजेंद्र रकटे,नानासाहेब गाढवे,नारायण भुजबळ,बापूसाहेब धनवटे,सतीश मोरे,भाऊसाहेब शिंदे,भगवंता मासाळ,संजय जगताप,हौशीराम चोळके रामकृष्ण बोरकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close