जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शहरात पुन्हा दुचाकी चोरीचे पर्व सुरु,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील एकावेळी एका रात्रीत तीन कार चोरी होऊन त्यांचा तपास लागलेला नसताना गत सप्ताहात रात्रीच्या सुमारास पुन्हा एक मारुती स्विफ्ट कार चोरीस गेली असताना त्याच दरम्यान आणखी हिरो पॅशन व बजाज डिस्कव्हर आदी सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी कोपरगाव बस स्थानकातून बेपत्ता झाल्या असल्याचा गुन्हा येथील रहिवासी गौतम अशोक खरात व अशोक शंकर त्रिभुवन यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.शहरातील कारसह दुचाकी वाहनधारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान दुचाकीची चोरी करताना २५-३० वयोगटातील दोन आरोपी स्पष्ट दिसत असून त्यात एकाने अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट,काळी साधी पॅन्ट,गळ्यात काळ्या रंगाचे उपरणे घातलेलं दिसत असून दुसऱ्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट,काळी साधी पॅन्ट,निळ्या रंगाची टोपी(कॅप) असे वर्णन दिसत असल्याचे कोपरगाव शहर पोलिसांना सांगितले आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरात चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र तयार झाले असून राजकीय नेत्यांचा पोलिसांवर आणि पोलिसांचा चोरट्यांवर धाक राहिलेला दिसत नाही त्यामुळे कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.रात्रीच्या सुमारास नागरीक सामसूम झाल्यावर चोरट्यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन शहरातील निवारा-सुभद्रानगर परिसरातून डॉ.जगदीश झंवर,सह्याद्री कॉलनी येथील लेखापरीक्षक दत्तात्रय खेमनर,आणि साईनगर या परिसरातून अड्.मनोज कडू यांची असे तब्बल एक-दोन नव्हे तर एक स्विफ्ट डिझायरसह दोन एर्टीगा अशा तीन कार चोरून आपला प्रताप दाखवला होता.तर त्यानंतर सुभद्रानगर येथील पी.विल्यम एस.पी.चंदन या इसमाच्या घरातून सोन्याची साखळी व दोन अंगठ्या असा ०१ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.तर दुसऱ्या दोन घटनेत कोपरगाव बस स्थानक येथून मुर्शतपुर येथील विशाल प्रकाश शिंदे यांची दुचाकी तर संजीवनी कारखाना पार्किंग मधून चांदेकासारे येथील कर्मचारी मच्छीन्द्र भाऊराव होन आदी दोन ठिकाणच्या अनुक्रमे २५ व १५ हजार असे ४० हजारांच्या दोन दुचाक्यांची चोरी केली आहे.अन्य अनेक चोऱ्या सातत्याने सुरु आहे.त्या बातम्यांची शाई वाळते न वाळते तो पुन्हा एकदा कोपरगाव शहरातील कालिंदीनगर या उपनगरात एक मारुती स्विफ्ट डिझायर गाडी (क्रं.एम.एच.१७ ए.जे.६४७७) चोरी करून आपला प्रताप दाखवला आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्याला प्रतिबंध होताना दिसत नाही.अशातच नुकत्याच राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारातून फिर्यादी व बस आगारात नोकरीस असलेले फिर्यादी गौतम खरात व अशोक त्रिभुवन यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या कर्तव्यावर जात असताना सदर दुचाकी या आगराच्या प्रवेशद्वारात लावल्या असताना व दुपारी जेवणाची सुट्टी झाली असताना ते पुन्हा आपल्या दुचाकी लावलेल्या जागी शोधण्यास आले असताना त्या ठिकाणी त्या आढळून आल्या नाही.गौतम अशोक खरात हे पहिल्या काळ्या रंगाच्या हिरो पॅशन (क्रं. एम.एच.१७ ए.वाय.६५४६) या सुमारे १५ हजार रुपये किमतीच्या गाडीचा शोध घेत असताना तेथील कर्मचारी अशोक त्रिभुवन हे आपली तितक्याच किमतीची बजाज डिस्कव्हर (क्रं.एम एच.१७ ए.सी.९४८६) शोधताना दिसून आले आहे.आपली दुचाकी शोधत असताना त्यांना आढळून आले आहे.त्यावेळी त्यांनी आपली हि बजाज डिस्कव्हर हि गाडी चोरट्यानी चोरून नेल्याचे सांगितले आहे.त्यांनी तेथील कोपरगाव बस आगारातील चलचित्रण तपासले असता त्यात आरोपी त्यांच्या गाड्या चोरून नेताना स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२४०/२०२४ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदशनाखाली पो.हे.कॉ.दिलीप तिकोणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close