जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पोलिसांची मोठी धाड,६.११ लाखांच्या गुटख्यासह कोपरगावात दोन गुन्हे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात अवैध व्यवसायात लक्षणीय रित्या वाढ होत असताना व त्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असताना काल रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास अ.नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरेगाव नजीक पोल्ट्री फॉर्म जवळ केलेल्या कारवाईत टाटा ए.सी.या छोट्या मालवाहू वाहनास पडकून त्यात ०६ लाख ११ हजार ५४० रुपयांचा राज्यात बंदी असलेला अवैध गुटखा जप्त केला आहे.मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नुकतीच कोपरगाव शहरात विकास मोहन आव्हाड यांच्या दुचाकीच्या डिकीतून ७.५० लक्ष रुपयांच्या रोख रकमेची मोठी चोरी झाली असताना स्थानिक पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेने काल तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठी कारवाई करून स्थानिक पोलिस प्रशासनास धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.आता पोलीस सावध होता काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात अलीकडील काळात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असल्याचे आढळून येत आहे.त्यामुळे नगर स्थानिक गुन्हे शाखेची या शहर आणि परिसरात वक्रदृष्टी झाली असून पूर्वी या शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त खबरीनुसार कोपरगाव शहर हद्दीत दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोजी केलेल्या कारवाईत तीन आरोपी व गुटख्याच्या दोन गाड्या जप्त केल्या होत्या.यातील २.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.त्यात एक मारुती ओमनी गाडी व मारुती वॅगणार अशांचा समावेश होता.चारचाकी,दुचाकी वाहन चोऱ्या आणि भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण तर वाढीला आळाच बसताना दिसत नाही.त्यात वकील,लेखा परीक्षक,डॉक्टरही सुटले नाही हे विशेष !

दरम्यान आणखी एका गुन्ह्यात आपल्या जमीन खरेदीसाठी आणलेले आपल्या दुचाकीच्या (क्रं.एम.एच.१७ सी.क्यु.२१८६) डिकीत ठेवलेले ७.५० लाख रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने खर्डे कॉम्पलेक्स समोर पाळत ठेऊन सकाळी ११.५७ वाजेच्या सूमारास डिकीचे कुलूप तोडून लंपास केले असल्याची फिर्याद कर्मचारी विकास मोहन आव्हाड (वय-२८) रा.शुक्लेश्वर मंदिर बेट यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचेसह पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट दिली आहे.

नुकतीच कोपरगाव शहरात विकास मोहन आव्हाड यांच्या दुचाकीच्या डिकीतून ७.५० लक्ष रुपयांच्या रोख रकमेची मोठी चोरी झाली असताना स्थानिक पोलिसांना स्थानिक गुन्हे शाखेने काल तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठी कारवाई करून स्थानिक पोलिस प्रशासनास धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.

सदरच्या अवैध गुटख्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्या मार्फत बातमी मिळाली होती की सुरेगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु आहे.त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी पाळत ठेऊन कारवाई केली असता त्यांना सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत एक क्रीम रंगाचा एक टाटा ए.सी.क्रमांकाचा टेंपो (क्रं.एम.एच.१५ एच.एच.४००१) हा संशियत रित्या आढळून आला होता.त्यावर रात्रीच्या ७.४५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असता त्यावरील चालकाने धूम ठोकली आहे.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत सदर टेंपोच्या आत १२ हजार ४८० रुपयांचा हिरा पानमसाला १०४ पुडे,किंमत प्रत्येकी १२० प्रमाणे,०३ हजार ०६० रुपयांचा रॉयल-७१७ तंबाकूचे एकूण १०२ पुडे,प्रत्येकी किंमत ३० रुपयांप्रमाणे,७६ हजार ८०० रुपयांचा राजनिवास पानमसाला ४०० पुडे,किंमत प्रत्येकी १९२ प्रमाणे,
१९ हजार २०० रुपयांचा प्रीमियम एक्स.एल.-०१ कंपनीचे ४०० पुडे,किंमत प्रत्येकी ४८ प्रमाणे,
०५ लाख रुपयांचा एक क्रीम कलरचा टाटा एस.एस.ई.कंपनीचा वरील क्रमांकाचा माल वाहू टेंपो असा एकूण अवैज ०६ लाख ११ हजार ५४० रुपयांचा जप्त केला आहे.दरम्यान या पथकाची लागल्यावर आरोपी रितेश सुभाष गादिया हा पळून गेला आहे.

दरम्यान या घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ.शिवाजी अशोक ढोकणे यांच्या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या दप्तरी अनुक्रमे गुन्हा क्रं.२४१ /२०२३ भा.द.वि कलम ३२८,१८८,२७२,२७३,अन्वये नोंद केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close