जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

श्री क्षेत्र घोटी येथील…या ट्रस्टची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र घोटी येथील श्रीमद सच्छिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मंदिर सभामंडपात मोठ्या उत्साहात आयोजित केली होती सभेच्या अध्यक्षस्थानी नामदेव बिलाडे हे होंते.

सदर प्रसंगी नूतन सभासद करून त्यातून जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,गावचे शाखा निवड गरज,त्यातून सभासद निवड कामानुरूप हितेशी साधकांमधून विश्वस्त निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.व आगामी काळात भाविकांना आवश्यक प्राथमिक सुविधा,भूखंड वाढ,’क’ वर्ग तीर्थक्षेत्रात या तीर्थक्षेत्राला समाविष्ट करण्याचा ठराव करण्यात आला आहे.या शिवाय,भक्तनिवास स्वच्छता गृह,सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन,चांगले व लक्षवेधी काम करणारे साधक,सामाजिक,धार्मिक कार्य करणारे कार्यकर्ते व भाविकांना पुरस्कार देण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली आहे.त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

परमार्थाची अत्यंत सुलभ रीत महाविष्णुपासून आलेल्या आनंद संप्रदायाचे बारावे महापुरुष संत श्रीपाद बाबा यांनी वारकरी संप्रदायाला अनमोल देणगी दीली.वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प.धुंडा महाराज देगूलकर,ह.भ.प.जोग महाराज,ह.भ.प.मामासाहेब दांडेकर,ह.भ.प.बंकट स्वामी,ह.भ.प.रंगनाथ महाराज परभणीकर,गुरुवर्य ह.भ.प.कोंडाजी बाबा डेरे व इतर अनेक महात्म्यांप्रमाणेच भक्‍तीचे महान कार्य संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबांनी केले आहे.त्यांच्या कार्याचा वसा आज त्यांच्या नावाने नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे सुरु असलेल्या ट्रस्टने सुरु ठेवला आहे.त्या ट्रस्टची बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर आरोटे,ट्रस्टचे उपाध्यक्ष ह.भ.प.बाबुराव भागडे,सचिव अविनाश हांडे विश्वस्त सर्व ह.भ.प.धोंडीराम भगत,विठाबाई हांडे,मायाताई नगरे,शारदाताई पाबळकर,ज्ञानेश्वर पाटील,हिंमत माळी,विकास गायकवाड,गोविंद जाधव,अशोक कापरे,विठ्ठलपंत बागडे,नारायण वरकंडे,शंकरराव भागडे,तुकाराम काळे,सतीश आरोटे,जंगलू तोकडे,खंडू पाबळकर,मनोहर हाडोळे,रामनाथ थोरात,अशोक शिंदे,जवळकेचे माजी उपसरपंच डी.के.थोरात,भगवान महाराज बागडे,भोलेनाथ चव्हाण,पप्पू भाऊ आरोटे,दिनकर वारगडे,माळी काका,गणेश शिंदे आदी मान्यवरसह बहुसंख्य भाविक उपस्थित होते.

सदर प्रसंगी विश्वस्त व्यवस्थेचे सचिव अविनाश हांडे यांनी अजेंडा व जमा रक्कम २५ लाख ६८ हजार,तर खर्च रक्कम १५ लाख हिशेब वाचन करताना सद्गुरू श्रीपाद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाचा हिशेब सादर केला आहे.
सदर प्रसंगी उपाध्यक्ष बाबुराव भागडे यांनी चालू असलेल्या अनिष्ठ प्रथांवर कडाडून हल्ला चढवला व आगामी काळात त्यास सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले आहे.या सभेत गायकवाड ताई,अ.नगर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे आदिनी सहभाग नोंदवला आहे.

यावेळी आगामी कालखंडात सभासद नोंदणी करून त्यातून विभाग निहाय विश्वस्त नेमण्याचा ठराव सर्वानुमते संमत केला आहे.त्याला काहीही हरकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला बहुमताने फेटाळण्यात आले आहे.

सदर प्रसंगी सर्वानुमते नूतन सभासद करून त्यातून जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,गावचे शाखा निवड गरज,त्यातून सभासद निवड कामानुरूप हितेशी साधकांमधून विश्वस्त निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.व आगामी काळात भाविकांना आवश्यक प्राथमिक सुविधा,भूखंड वाढ,’क’ वर्ग तीर्थक्षेत्रात या तीर्थक्षेत्राला समाविष्ट करण्याचा ठराव करण्यात आला आहे.या शिवाय,भक्तनिवास स्वच्छता गृह,सौर ऊर्जा वापरास प्रोत्साहन,चांगले व लक्षवेधी काम करणारे साधक,सामाजिक,धार्मिक कार्य करणारे कार्यकर्ते व भाविकांना पुरस्कार देण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली असून त्यास उपस्थितांनी दुजोरा दिला आहे.

सदर सर्वसाधारणसभेचे प्रास्तविक व इतिवृत्त वाचन ट्रस्टचे सचिव अविनाश हांडे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार हिंमत माळी यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close